बनगरवाडी ......माणदेशाचे थोर साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांची मेंढपाळ लोकांच्या जगायला जाण्याच्या अनुभवावर आधारित एक उत्कृष्ट कादंबरी. 1950 च्या दशकात व्यंकटेश तात्यांनी हा विषय लिहिला. त्यानंतर 1954 साली " मौज " च्या दिवाळी अंकात ती एक गोष्ट स्वरूपात पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. पुढे 1955 ला या गोष्टीचे कादंबरीत रूपांतरण झाले. या कादंबरीचे मराठी साहित्य जगात एक अक्षर वाड्मय म्हणून आजही आहे.जगभरातल्या 13 विविध भाषांमध्ये या कादंबरीचे रुपांतर होऊन हा विषय केवळ देशातच नव्हे तर जगात चर्चिला गेला.1999 साली या कादंबरीची 14 वी आवृत्ती निघाली. या विषयावर पुढच्याच वर्षी "बनगरवाडी " याच नावाने अमोल पालेकर दिग्दर्शित चित्रपट ही निघाला. जगभरात माणदेशी मेंढपाळ लोकांच्या व्यथेशी सहानुभूती, करुणा, दया व्यक्त केल्या गेल्यात. ......परंतू 21 व्या शतकाच्या पूर्वार्धातही माणदेशी मेंढपाळांचे जगायला जाणे सुरूच आहे.
No comments:
Post a Comment